चिपळुणात २७ रोजी निर्भय बनोचा नारा*
आज देशातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता सर्वसामान्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. मुलभूत प्रश्नांकडे जनतेचे लक्ष जावू नये यासाठी लोकांना धर्मा-धर्माच्या अस्मितेमध्ये गुंतवून ठेवण्याचे सुनियोजन षडयंत्र सुरू आहे. त्यामुळे या विरोधात जनतेचा आवाज बुलंद करून जागृती निर्माण करण्यासाठी निर्भय बनो एक अभिनव चळवळ उभी केली जाते आहे. या पार्श्वभूमीवर २७ जानवारी रोजी शहरातील अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलामध्ये सायंकाळी ४ वाजता जाहीर सभा होणार असल्याची माहिती अभियान आयोजकांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. www.konkantoday.com