उद्योग मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची प्रकृती स्थीर; मात्र आरामाचा डॉक्टरनी दिला सल्ला: तरी करणार रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा
राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी – रायगडचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांना अति उच्च दाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना फॅमिली डॉक्टरनी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.
त्यानुसार मंत्री उदय सामंत यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुढील २४ तास त्याना डॉक्टरांच्या निरीक्षणा खाली ठेवण्याचा सल्ला डॉक्टरने दिला असून सध्या त्यांना आरामाची गरज असल्याचे सांगितले..मात्र डॉक्टरांचा सल्ला न ऐकता लोकांना मी वेळ दिली आहे. माझी लोक… माझे मतदार माझी उद्या वाट बघत आहेत… मला दौऱ्यावर जायचं आहे असे सांगत जनतेच्या हिताचा विचार करणारे आहोत असे पालकमंत्री उदय सामंत यांनी दाखवून दिले. आपल्याला जरी त्रास होत असला तरी माझी ऊर्जा माझे मतदार राजा असून मी त्यांच्यात गेलो की मला बर वाटेल असे पालकमंत्री उदय सामंत यांनी डॉक्टरांना सांगून तें उद्या मुबंईतुन रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
. मला माझ्या मतदारांनी आशीर्वाद दिले आणि त्यांची दुवा माझ्या सोबत आहे. त्यामुळे मी माज्या जीवाची चिंता करत नाही माझा वेळ माझ्या मतदार संघात लोकांसाठी देणार असल्याचे सांगत पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरीकरासाठी उद्या रत्नागिरीत येणार आहेत.
,www.konkantoday.com