कुटुंबियांसह आ. राजन साळवींनी घेतली पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट


रत्नागिरीच्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या चौकशी व कारवाईनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूरचे आमदार राजन साळवी हे संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाला नुकतेच रवाना झाले. त्यांनी मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी अनुजा व चिरंजीव शुभम राजन साळवी हे देखील उपस्थित होते. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपली तसेच परिवाराची आस्थेने चौकशी करून ठाकरे कुटुंब व सर्व शिवसेना पाठिशी असल्याचे सांगितल्याचे आ. साळवी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button