शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदयजी सामंत मुंबईतील रुग्णालयात दाखल


शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदयजी सामंत यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंत्री उदय सामंत यांना उच्च रक्त दाबाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सध्या उदय सामंत यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरु असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दावोसचा दौरा केला होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button