*वैभववाडी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू, रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी दिली माहिती
गतीशक्ती योजनेतील कोकण रेल्वेला कोल्हापुरातून जोडणाऱ्या वैभववाडी मार्गाचे मोठ्या प्रकल्पाच्या सर्वेक्षण सुरू आहे, तसेच लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची सुरू होईल,अशी माहिती रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी बुधवारी कोल्हापुरात दिली.भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेचे वरिष्ठ अधिकारी राहिलेले यादव यांनी कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सला भेट देऊन वार्षिक तपासणी केली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी होते. यावेळी त्यांनी अमृत भारत योजनेअंतर्गत कोल्हापूरातील रेल्वे स्थानकावर सुरु असलेल्या कामाचीही प्रत्यक्ष पाहणी केली. सांगली आणि मिरज मार्गावरील काम सहा महिन्यात पूर्ण होईल, वैभववाडी मार्गाचा डीपीआर तयार आहे, यासाठी निधीची कमतरता पडणार नाही, रेल्वे बोर्डाच्या मान्यता मिळताच याचे काम सुरू होईल.
www.konkantoday.com