
कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीतर्फेसर्वपक्षीय रेलरोको स्थगित
कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीतर्फे दि.२६ जानेवारीला चिपळूणच्या जंक्शन रेल्वे स्टेशनवर सर्वपक्षीय रेलरोको आंदोलन करण्यात येणार होते. या आंदोलनाचा रेल्वे प्रशासनाने चांगलाच धसका घेतला होता. याबाबत मंगळवारी डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या दालनात झालेल्या बैठकीत कोकण रेल्वेच्या अधिकार्यांनी लेखी आश्वासन दिल्याने दोन महिन्यांसाठी हे रेलरोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, असे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी जाहीर केले आहे.
चिपळूणचे डीवायएसपी राजमाने यांनी कोकण रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी व विविध खात्यांचे अधिकारी, तसेच कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांची मंगळवारी बैठक घेतली.
www.konkantoday.com