अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे ३ दिवसांचे सेट / नेट मार्गदर्शन
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे रविवार दि. ४, ११ व १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत नेट सेट परीक्षांसाठी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. नेट / सेट मार्गदर्शन करण्याचे अकादमीचे हे चौथे वर्ष आहे. मागील ३ वर्षात अकादमीमधून नेट / सेट स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन घेऊन अकादमीचे ४ प्रशिक्षणार्थी सेट परीक्षा तर २ प्रशिक्षणार्थी नेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
अकादमीमार्फत नेहमीच निरनिराळ्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते. अकादमीतर्फे दरवर्षी MPSC इंटिग्रेटेड कोर्स, फाऊंडेशन कोर्स, बँकिंग – रेल्वे – इन्शुरन्स बॅच, तलाठी भरती, पोलीस भरती हे निरनिराळे कोर्सेस घेतले जातात. बरेच विद्यार्थी येथून प्रशिक्षण घेऊन वेगवेगळ्या स्तरांवर नोकरी करत आहेत. अकादमीतर्फे गेली अनेक वर्षे अल्प फी घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
सदरची कार्यशाळा ही तिन्ही दिवस फेब्रुवारी मधील रविवारी आयोजित करण्यात आली आहे. नेट सेट मार्गदर्शन कार्यशाळेसाठी तीन दिवसांची मिळून रु. ५००/- इतकीच फी आकारली जाणार असून याचा फायदा प्राध्यापक वर्ग तसेच पदव्युत्तर पदवी करत असणा-या प्रथम व व्दितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी करून घ्यावा, असे आवाहन अकादमी तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ८८०५५०६८८३/ ९४०३५०७४८० पत्ता – तळमजला, जे.एस.डब्लू बिल्डींग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, खातू नाट्यमंदिराचे मागे , रत्नागिरी – ४१५ ६१२
www.konkantoday.com