साडवली येथे कारच्या धडकेत सायकलस्वार तरूणाचा जागीच मृत्यू
देवरूख-संंगमेश्वर मार्गावरील साडवली येथे एका सायकलस्वाराला फॉर्च्यूनर कारची पाठीमागून जोराची धडक बसल्याने सायकलस्वार तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.शोभीत अनंत जाधव (वय-२२, रा. निगुडवाडी. ता. संंगमेश्वर) असे अपघातात मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शोभीत जाधव हा देवरूख- संंगमेश्वर मार्गावरून देवरूखहून साडवलीच्या दिशेने सायकलवरून जात होता. याचवेळी देवरूखहून संगमेश्वरच्या दिशेने जात असलेल्या फॉर्च्यूनर गाडीने सायकलस्वार शोभीतला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत सायकलस्वार शोभीत याच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला तात्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.
www.konkantoday.com