रुळाचे काम सुरू असताना रेल्वे कामगारांना लोकल ट्रेनची धडक! तिघांचा मृत्यू, मुंबईतील धक्कादायक प्रकार
रेल्वेचे तीन कर्मचारी रुळांवर ड्युटीवर असताना त्यांना मुंबईजवळ लोकल ट्रेनने धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अपघातात तीनही रेल्वे कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम सुरू असताना रुळावर अचानक रेल्वे आली. कर्मचाऱ्यांमध्ये रेल्वे नेमकी कोणत्या रुळावर येणार याबद्दल गोंधळ झाला. त्यांनी रुळाच्या बाहेर धाव घेण्यास सुरुवात केली मात्र ते स्वतःला वाचवू शकले नाहीत. लोकल ट्रेनने धडक दिल्यानंतर गंभीर जखमी असलेल्या तिन्ही कर्मचाऱ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.मिळालेल्या माहितीनुसार ही घटना वसई-नायगाव परिसरात सोमवारी (२२ जानेवारी) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. वासू मित्र (वय ५६), सोमनाथ उत्तम लाबुतरे (वय ३७) आणि सचिन वानखेडे (वय ३७) अशी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
www.konkantoday.com