राम लल्लाच्या शोभा यात्रेला रत्नागिरीत लोटला जनसमुदायपालकमंत्री उदय सामंत यांनी शोभायात्रा संपे पर्यत घेतला सहभाग
*रत्नागिरी, )- अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळा ‘राम मंदिर ते ग्राम मंदिर’ जिल्ह्यात झाला दिवस घरोघरी दिवाळी उत्सवाचा दिवस साजरा करताना पालकमंत्री उदय सामंत यांनी राम मंदिरापासून प्रमोद महाजन क्रिडांगणा पर्यत शोभा यात्रा काढणार असल्याचे सांगून समस्त रत्नागिरीकराना या शोभा यात्रेत सहभागी होण्याचे आहवान केले होते त्या आहवानाला स्वीकारत समस्त रत्नागिरीकर हजारोच्या संख्येने या शोभा यात्रेत सहभागी झाले होते. अयोध्या मध्ये राम लल्लाची प्राण प्रतिष्ठापणा करण्यात आली मात्र त्याचा जल्लोष कित्येक पटीने रत्नागिरी शहरात करण्यात आला. या शोभा यात्रेत पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतः सहभाग नोंदवला होता मात्र सहभागी होऊन तें थांबले नाहीत तर शोभा यात्रेत ३ तास हुन अधिक काळ तें रत्नागिरी करासोबत चालत होते. ही शोभा यात्रा डोळयांचे पारडे टिपणारी होती.
राम मंदिर होणं ही सर्वांची अस्मिता होती. ते पूर्ण करणारे नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद मोदीजी यांचा अभिमान आहे असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले या शोभा यात्रेत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्याधिकारी तुषार बाबर, श्री राम मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘जय श्री राम, जय सियाराम’ च्या जयघोषणा देत,फटाकांची अतिशबाजी करून रत्नागिरीत हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.रत्नागिरीच्या प्रमोद महाजन क्रिडांगणावर फाटाकांची आतिषबाजी करून राम लल्लाला अभिवादन करण्यात आले.या शोभा यात्रेत युवा, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला,तरुण मोठया संख्येने झाले सहभागी झाले होते. शोभा यात्रेत वेगळे वेगळे देखावे ठेवण्यात आले होते.पालकमंत्री उदय सामंत यांनी शोभायात्रा संपे पर्यत सहभाग घेतला होता. प्रमोद महाजन क्रिडांगणावर अतिश बाजी केल्यानंतर राम मंदिरात महा आरती मध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी सहभाग घेतला. शोभा यात्रेत अनेक चाहत्यांनी आणि मुलांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या बरोबर सेल्फी आणि फोटो काढले. येणाऱ्या प्रत्येका बरोबर पालकमंत्री यांनी फोटो काढले. लहान मुलांनी पालकमंत्री बरोबर डान्स करण्याचा आग्रह केला आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी डीजेच्या तालावर ठेका धरतं विद्यार्थ्यांबरोबर डान्स केला.महाआरती झाल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.
www.konkantoday.com