
रत्नागिरी पोलिसांचे आवाहन“सोशल मिडिया वर आक्षेपार्ह दृशे / फोटो/व्हिडिओ तसेच अफवा न पसरविण्याबाबत आवाहन”.
या द्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अलीकडे सोशल मीडियावर घडलेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर,
1) सोशल मिडिया वर सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी मार्फत 24×7 निगराणी ठेवण्यात येत आहे.
2) सोशल मिडियाद्वारे कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह चित्र, पोस्ट, अफवा, चुकीचे संदेश अगर आक्षेपार्ह संदेश व व्हिडीओ प्रसारित केल्यास रत्नागिरी पोलीस दलाकडून कडक कारवाई करण्यात येणार.
3) कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये अथवा बळी पडू नये.
4) सोशल मिडिया वर कोणत्याही धर्माबद्दल अफवा पसरविल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल याची दक्षता घ्यावी.
5) Facebook, Twitter, Instagram, Koo व YouTube च्या माध्यमातून कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह चित्र, पोस्ट, अफवा, चुकीचे संदेश / आक्षेपार्ह संदेश अथवा व्हिडीओ प्रसारित करण्यात येऊ नयेत.
6) सर्व जातीय धर्मांच्या आक्षेपार्ह घटनांवर कठोर कारवाई करण्यात येणार व अश्या घटनांवर रत्नागिरी पोलीस दलातर्फे कडक धोरण स्वीकारले जाईल.
7) रत्नागिरी मधील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जातीय सलोखा राखण्यामध्ये पोलीसांना सहकार्य करावे.
www.konkantoday.com