
रत्नागिरीकरांना वर्षभर मिळणार डिस्काऊंट
रत्नागिरीतील विविध क्षेत्रातील व्यावसायिकांच्या व्यवसायावर ग्राहकांना वर्षभर वाजवी डिस्काऊंट मिळणार आहे. रत्नागिरी उद्योजक ग्रुपने नवीन संकल्पना शहरवासियांसाठी राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
याची नोंदणी २३ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता शहरातील टिळक आळी येथील वैद्य मंगल कार्यालय येेथे सुरू होणार आहे. याठिकाणी इच्छुकांना या संकल्पनेसंदर्भात सविस्तर माहिती दिली जाईल आणि सर्व शंकांचे निरसन केले जाईल. रत्नागिरीतील हरहुन्नरी उद्योजक गौरांग आगाशे यांनी ही संकल्पना स्पष्ट केली.
आगाशे म्हणाले की, या योजनेच्या माध्यमातून निरनिराळे उद्योजक जोडून ग्राहकांना त्याचा फायदा मिळण्यास मदत होणार आहे. यामध्ये मेडिकल, किराणा, ज्वेलरी, हॉटेल, लेडीज वेअर, जेण्टस वेअर, नर्सरी ऑनलाईन शॉपिंग अशा विविध स्वरूपातील व्यवसाय यामध्ये समाविष्ट आहेत.
या योजनेचा तपशिल व माहिती जाणून घेण्यासाठी ९७३०३१०७९९ या व्हॉटसऍप क्रमांकावर मेसेज करावा व आपले नाव नोंदवावे, असे आवाहन गौरांग आगाशे यांनी केले आहे.
www.konkantoday.com