
मराठा समाजाला दिलासा मिळणार? आरक्षणावरील क्युरेटीव्ह याचिकेवर 24 जानेवारीला सुनावणी
मराठा आरक्षणावर दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर बुधवार 24 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. दुपारी 1.30 वाजता ही सुनावणी होणार असून न्यायमूर्ती खन्ना आणि न्यायमूर्ती गवई यांच्यासमोर ही सुनावणी पार पडेल.काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिका स्विकारली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्याने मराठा आरक्षणाबाबत हा मोठा दिलासा मिळाला असल्याचं म्हटलं जातं होतं. त्यामुळे आता या सुनावणीमध्ये मराठा सामजाला दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
www.konkantoday.com