दापोलीत गजराज मिरवणूक
अयोध्येत राम मंदिरामध्ये राममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. या आनंद प्रित्यर्थ कै. श्रीधर फाटक यांचे स्वप्न साकार करण्यासाठी फाटक परिवाराच्या वतीने दापोलीत खास गजयात्रा काढण्यात आली.
ही यात्रा दापोली तालुक्यातील जालगाव भैरी मंदिर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बुरोंडी नाका, फॅमिली माळ बाजारपेठ, राम मंदिर, मच्छि मार्केट येथून पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शोभायात्रा आल्यावर तिथे दापोली तालुक्यातील कारसेवकांचे सत्कार करण्यात आले. www.konkantoday.com