जमिनीच्या वादातून थेट जेसीबीने घर पाडले, गुन्हा दाखल


जमीन जागेच्या वादातून जेसीबीच्या सहाय्याने घराच्या समोरील आणि बाजूचा भाग पाडून घराचे नुकसान आणि नासधूस केल्याच्या घटनेप्रकरणी लांजा तालुक्यातील कोचरी बेंद्रेवाडी येथील जागा मालक आणि जेसीबी चालक अशा दोघांवर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी २० जानेवारी रोजी सायंकाळी त्यांना अटक करण्यात आली.
या घटनेत घरातील महिलेला शिवीगाळ करत हात धरून महिलेला घरातून बाहेर काढल्याप्रकरणी शनिवारी २० जानेवारी रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी आक्रमक भूमिका घेतली. जोपर्यंत संबंधित व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तेथून हलणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर सायंकाळी यातील मच्छिंद्र महेंद्र कांबळे व जेसीबी चालक यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
कोचरी बेंद्रेवाडी येथील वसंत बेंद्रे व मच्छिंद्र महेेंद्र कांबळे हे एकमेकांशी शेजारी राहणारे असून त्यांच्यात जमीन जागेवरून वाद र्निाण झाला. १९ जानेवारी रोजी फिर्यादी वसंत बेंद्रे हे कार्यकारी दंडाधिकारी लांजा येथे आले असताना यातील मच्छिंद्र महेंद्र कांबळे, दया शंकर कांबळे, दीप्ती महेंद्र कांबळे यांनी जमीन जागेच्या कारणावरून संगनमताने वसंत बेंद्रे यांच्या घरी जावून त्यांच्या घरात घुसून त्यांची पत्नी प्रतीक्षा वसंत बेंद्रे हिला शिवीगाळ करत हात धरून घरातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी आणलेल्या जेसीबीद्वारे (केए२८-एमए-३१०१) वसंत बेंद्रे यांच्या घराच्या समोरील आण बाजूचा भाग पाडून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button