आधी जीआर काढा तरच करणार मराठा सर्वेक्षण
शासनाने विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र त्यासंदर्भात शासनाने निर्णय काढलेला नाही. त्यामुळे मराठा आरक्षण सर्वे करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांना जरी प्रशासनस्तरावरून सूचना देण्यात आल्या असल्या तरी संप सुरू असल्यामुळे हे काम सध्या करू शकत नाही. संप मिटल्यावर आम्ही हा सर्वे करू असे निवेदन ९ तालुक्यातील अधिकार्यांना देण्याच्या सूचना अखिल भारतीय आशा गटप्रवर्तक आयटक फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकर पुजारी यांनी केल्या आहेत.
जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांनी आरोग्यविषयक अत्यंत महत्वाचे काम सातत्याने करत आहेत. त्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र त्यासंदर्भात शासन निर्णय काढलेला नाही. गटप्रवर्तक महिलांना दरमहा दहा हजार रुपये मानधन वाढ, दरमहा आरोग्यवर्धिनीचे पंधराशे रुपये, कंत्राटी कर्मचार्यांचे सर्व हक्क व भाऊबीज तसेच आशा महिलांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ व भाऊबीज देण्याचा शासन निर्णय काढल्याशिवाय संप मागे घेणार नाही अशी भूमिका घेत राज्यभरात आयटक संघटनेने संप सुरू केला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे दोन हजाराहून अधिक आशा गटप्रवर्तक महिला सहभागी झालेल्या आहेत. या महिलांनी शासनाच्या योजनांची ऑनलाईन माहिती भरण्याचे कामही थांबवले आहे.
www.konkantoday.com