
मी पृथ्वीवरील सर्वात भाग्यवान व्यक्ती’-शिल्पकार अरुण योगीराज
अयोध्येत आज ( दि. २२) रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला, या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘मी पृथ्वीवरील सर्वात भाग्यवान व्यक्ती’ अशी पहिली प्रतिक्रिया कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण याेगीराज यांनी दिली आहे.शिल्पकार अरुण योगीराज यांनी म्हटले आहे की, मी स्वतःला या पृथ्वीवरील सर्वात भाग्यवान व्यक्ती मानतो की, माझे शिल्प अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निवडले गेले आहे. माझ्या पूर्वजांचा, कुटुंबातील सदस्यांचा आणि प्रभू रामलल्लाचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहे. कधीकधी मला असे वाटते की, मी स्वप्नांच्या जगात आहे, असेही योगीराज यांनी व्यक्त केले आहे.
www konkantoday.com