
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द.
अहमदाबादमध्ये झालेल्या विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाच्याविमानांमध्ये सातत्याने तांत्रिक बिघाडाच्या घटना घडत आहेत. आजच(दि. १७) अहमदाबादहून लंडनला जाणारे एक विमान तांत्रिक बिघाडामुळे रद्द केल्याचे समोर आले होते.त्यानंतर आता दिल्लीहून पॅरिसला जाणारे आणखी विमान रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.कंपनीने सांगितले की, एअर इंडियाचेदिल्लीहून पॅरिसला जाणारे बोईंग ड्रीमलाइनर AI143 विमान रद्द करण्यात आले आहे. उड्डाण करण्यापूर्वी आवश्यक तपासणी दरम्यान विमानात काही तांत्रिक समस्या आढळून आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. सध्या या विमानाची तपासणी केली जात आहे. अचानक विमानाचे उड्डाण रद्द झाल्याबद्दल कंपनीने दिलगिरीही व्यक्त केली