रत्नागिरीमध्ये पहिले हिंदी कवी संमेलन
नगर राजभाषा कार्यान्वयन समिती द्वारा विश्व हिंदी दिवसाच्या निमित्ताने पहिले हिंदी काव्य संमेलनाचे आयोजन भारतीय तटरक्षक कार्यालयाच्या सहयोगाने केले.
समिती केंद्र सरकारचे कार्यालय, बँक, वीमा व केंद्र सरकारच्या अंतर्गत असणारे कार्यालयांमध्ये हिंदी भाषेचा कार्यालयीन कामकाजात वापर व प्रसार करण्याचे दृष्टीने भारत सरकार, गृह मंत्रालय राजभाषा विभागद्वारा गठीत केलेली आहे. समितीचे अध्यक्षपद तथा संचालन बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयास सोपविलेले आहे. समिती कार्यालयीन कामकाजा बरोबरच आपले सामाजिक दायित्व सुद्धा स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरचे आयोजन करीत असते. तसेच विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये हिंदी विषयी कार्यक्र्रम आयोजित करीत असते. www.konkantoday.com