परप्रांतीय लोकांची दादागिरी सुरू,सिंधुदुर्गात मासेमारी नौकेवर परप्रांतीय हायस्पीड नौकेचा हल्ला
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्रात 12 ते 13 वाव खोल समुद्रात नांगरून ठेवलेल्या मालवण येथील आशा मोहन शिरसाठ यांच्या विशवेश्वर प्रसाद या बोटीला परराज्यातील हायस्पीड ट्रॉलरने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.हा हायस्पीड ट्रॉलर्स बोटीला धडक देऊन पळून गेला.यात शिरसाठ यांच्या बोटीचे 8 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बोटीवरील 9 खलशी मात्र सुदैवाने बचावले.समुद्रातील या जीवघेण्या थरारामुळे मच्छिमारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेबाबत बोटीचे मालक मोहन शिरसाठ यांनी सहाय्यक मत्स्यआयुक्त कार्यालयात तक्रार दिली आहे.
www.konkantoday.com