
विनोदी अभिनेता मकरंद अनासपुरे चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ओरीमध्ये दाखल
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी आणि संवेदनशील अभिनेता म्हणून प्रख्यात असलेले कोकणचे सुपुत्र मकरंद अनासपुरे सध्या रत्नागिरी तालुक्यातील ओरी गावात कौटुंबिक विषयावर आधारित आपल्या ओवा या मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणात दंग आहेत. अनासपुरे म्हणाले की, मी कोकणातील असून मला कोकण आणि कोकणातील निसर्गाविषयी प्रचंड ओढ आहे. मला माझ्या ओवा मराठी चित्रपटासाठी ओरीसारख्या निसर्गाच्या सानिध्यातील गावामध्ये चित्रिकरण करण्याची संधी मिळत आहे, याविषयी मला खूप आनंद वाटतो आहेे. चित्रपट निर्मितीसाठी येथील ग्रामस्थांचे उत्तम सहकार्य मिळत आहे. चित्रपटाच्या आशयानुसार अनेक प्रसंग साकारताना स्थानिक कलाकार यांना संधी दिली जात असल्याचेही अनासपुरे यांनी सांगितले. आपल्या भागातील स्थानिक कलाकार नाट्य व सिनेमा सृष्टीत येण्यासाठी आपला प्रयत्न असतो आणि यापुढेही कायम राहील असे त्यांनी आवर्जुन सांगितले.
ओवा या चित्रपटासाठी शालेय विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या आवडीप्रमाणे काम देण्याचा माझा मानस आहे. येथील स्थानिक विद्यार्थ्यांना देखील छोट्या छोट्या भूमिका देवून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा माझा प्रयत्न आहे. जाकादेवी हायस्कूलच्या काही विद्यार्थ्यांना या चित्रपटात संधी दिली आहे. अनासपुरे चित्रपट निर्मितीसाठी ओरी गावी दाखल झाल्याने ओरी गावासह संपूर्ण पंचक्रोशीतून आनंद आणि समाधान व्यक्त होत आहे. www.konkantoday.com