
एसटी चालकाने वाचवले चाळीस प्रवाशांचे प्राण
देवरुख रत्नागिरी रस्त्यावर झाडाची फांदी विजेच्या तारांवर कोसळून त्या विद्युत भारीत तारा जाणाऱ्या एसटीवर पडण्याची शक्यता असतानाच एसटी चालकाने प्रसंगावधान राखून एसटी मागे घेतल्याने एसटी मधील चाळीस प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
देवरुख आगारातून रत्नागिरीकडे एसटी बस घेऊन जाणारे काशीराम अणेराव हे एसटी बस घेऊन निघाले असता वाटेत आंबव सुतारवाडी जवळ एक झाड विजेच्या तारांवर कोसळून विजेच्या तारा एसटीवर पडणार असे दिसताच चालकांने गाडी थांबवून ती लगेचच मागे घेतल्याने मोठी दुर्घटना टळली या गाडीत चाळीस प्रवासी होते.
www.konkantoday.com