शरद पवारांनी अजित पवारांचं नाव न घेता फटकारलं


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीच्या गोविंदबागेत पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. यावेळी बोलताना पवारांनी त्यांच्या मनातली खंत पहिल्यांदाच बोलून दाखवली.मी माझ्या मुलीला बाजूला ठेवून इतरांना मोठमोठी जबाबदाऱ्या दिल्या, एवढं करूनही अनेक लोक राष्ट्रवादीला सोडून केले, जनतेला हे आवडलं नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.
‘केंद्र आणि राज्यात मी 50 वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेत आणि विरोधात होतो. माझी कन्या सुप्रिया तीन वेळा खासदार झाली. तिला उत्कृष्ठ संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, तिच्याकडे कर्तुत्व आणि नेतृत्व आहे. असं असताना मी स्वत: हिंगोलीच्या सुर्यकांता पाटील, माझे सहकारी पीए संगमा यांच्या मुलीला महिला मंत्री म्हणून पुढे केलं, माझ्याबरोबर असणाऱ्या इतरांना सत्तेत मोठमोठी जबाबदारी दिली, मात्र माझ्या मुलीला मी बाजूला ठेवलं. एवढं करूनही राष्ट्रवादीला सोडून अनेक लोक बाजूला गेले, जनतेला हे आवडलं नाही, महाराष्ट्राची जनता अशा लोकांना मतपेटीतूनच बाजूला केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही,’ अशा परखड शब्दांमध्ये शरद पवारांनी अजित पवारांचं नाव न घेता फटकारलं आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button