
रत्नागिरी जिल्ह्यात जुलै महिन्यातच पावसानं दोन हजार मिलिमिटरच्या सरासरीचा आकडा गाठला
गेल्या आठ दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या कोसळधारा पहायला मिळत आहेत. सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं दुपारनंतर पुन्हा एकदा सरींवर कोसळण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जुलै महिन्यातच पावसानं दोन हजार मिलिमिटरच्या सरासरीचा आकडा गाठलाय. अजून जुलै महिन्याचे १० दिवस बाकी असताना १ जूनपासून आजपर्यत पावसानं १९३९ मिलिमिटरचा टप्पा गाठलाय.
www.konkantoday.com