
मुंबई पुणे द्रुतगती आयरिश टेम्पो अज्ञात वाहनावर आदळल्याने चालका सह दोघांचा मृत्यू
आज दि.19/01/2024 रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबई लेनवर किमी 38:00 दरम्यान आयशर टेम्पो क्रमांक DD 01 N 9446 ची अज्ञात वाहनास मागून धडक बसल्याने चालक अनिल लाखन गावीत वय 27 वर्षे, रा.सिल्वास, दादर नगर हवेली याचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघातात आयशर टेम्पोची केबिन पूर्णपणे दबल्याने सदर केबिनमध्ये चालका सोबत अनिकेत बोरसा – 24 रा. सिल्वास याला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्याचाही मृत्यू झाला. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, मृत्युंजय देवदूत, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेची टीम यांच्या मदतीने केबिनमधे अडकलेल्या मृत व्यक्तींना बाहेर बाहेर काढून ॲम्बुलन्समधून खोपोली नगरपालिका हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे.
अपघातातील अज्ञात वाहन चालक हा अपघाताची माहिती न देता पळून गेला आहे. आयशर टेम्पो क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत चालू केली आहे.
सदर घटना खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
www.konkantoday.com