महाराष्ट्र खो-खो संघाच्या प्रशिक्षकपदी पंकज चवंडे
भारत सरकार आयोजित राष्ट्रीय स्तरावरील खेलो इंडिया युथ गेम्स २०२४ स्पर्धा तामिळनाडू येथे होत आहे. खो-खो स्पर्धेस सहभागी होणार्या महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी रत्नागिरीचे राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज रमेश चवंडे यांची निवड झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धांमधील सुवर्णमयी कामगिरीची दखल घेण्यात आल्याने रत्नागिरीच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
खेलो इंडिया युथ गेम्समध्ये खो-खो क्रीडाप्रकारात महाराष्ट्राचे मुले व मुलींचे संघ सहभागी होणार आहेत. त्यासाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकदी राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडून राज्यातील तज्ञ मार्गदर्शकांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चवंडे यांची निवड झाली. पंकज यांनी आतापर्यंत असोसिएशनच्या विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
www.konkantoday.com