महाराष्ट्राच्या कांबळे दाम्पत्याला सर्वात मोठा बहुमान, अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणावेळी मोदींसोबत पूजा करणार


अयोध्येतील श्रीराम मंदिराचं येत्या 22 जानेवारीला लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे.

या प्राण प्रतिष्ठाच्या सोहळ्यात मोदींसह 11 दाम्पत्य पूजा करणार आहेत. या पूजेचा बहुमान महाराष्ट्रातील एका दाम्पत्याला मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रामभक्तांकडून आनंद व्यक्त केला जातोय.

अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचा बहुमान देशातील 11 दाम्पत्यांना मिळाला आहे. त्यात नवी मुंबईच्या कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे. अयोध्येत 22 जानेवारीला श्रीरामल्लांच्या प्राण प्रतिष्ठाच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रभू श्रीरामांची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला मिळाला आहे. विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे अशी या पती-पत्नीची नावे आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button