मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथील ट्रॅक्टरवर लपून ठेवलेल्या जिलेटीनच्या १५४ कांड्या सापडल्याने खळबळ
मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथील ट्रॅक्टरवर लपून ठेवलेल्या जिलेटीनच्या १५४ कांड्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मंडणगड पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला असून, ४ लाख ०२ हजार ७८१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रतनलाल बाळू रामजी तेली (४३, रा. समर्थनगर भिंगळोली, मंडणगड, मूळ रा. पहुना, चित्तोडगड, राजस्थान) असे गुन्हा दाखल केलेल्या प्रौढाचे नाव आहे.
भिंगळोली येथील रतनलाल तेली याच्या ट्रॅक्टरवर १५४ जिलेटीनच्या कांड्या ठेवलेल्या होत्या. या कांड्या पांढऱ्या प्लास्टिक आच्छादनामध्ये गुंडाळून ठेवलेल्या होत्या. त्यावर इंग्रजीमध्ये डेंजरस एक्सप्लोझिव्ह, टायगर सुपर पॉवर ९० जोगनिया एक्सप्ललोझिव्ह प्रा. लि. गाव हदियाखेरी अण्ड कंपनी, जि. भिलवारा, राजस्थान असे लिहिलेले होते.
www.konkantoday.com