
पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांनी सातासमुद्रापलिकडून घेतला राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आढावा
दिनांक 22 जानेवारी रोजी करोडो भारतीयांचं स्वप्न सत्यात उतरत असून देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी ह्यांच्या शुभहस्ते अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या “वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम” च्या जागतिक परिषदेसाठी स्वित्झर्लंड मधील दावोस येथे असताना देखील महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दूरदृश्यप्रणाली द्वारे रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा दोन्ही जिल्ह्यांचा आढावा घेतला. रत्नागिरी आणि रायगड दोन्ही जिल्ह्यांमध्ये ह्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हे कार्यक्रम न भूतो, न भविष्यति असे करण्याचा निर्धार मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी अधिकाऱ्यांना बोलून दाखवला. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 196 तर रायगड जिल्ह्यात सुमारे 210 राममंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ह्या कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी थेट स्वित्झर्लंड वरून दोन्ही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना संबंधित सूचना दिल्या. दरम्यान उद्या दि. 20 जानेवारी रोजी मा. ना. उदयजी सामंत हे स्वित्झर्लंड दौऱ्यावरून भारतामध्ये परतणार असून उद्या पुन्हा मुंबईतून ना. उदयजी सामंत अधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून ना. उदयजी सामंत पुन्हा दोन्ही जिल्ह्यांतील कार्यक्रमांचा आढावा घेणार आहेत.
www.konkantoday.com