त्याच नेत्याच्या हातून आज पक्षच सुटला -शर्मिला ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अर्धांगिणी शर्मिला ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्या माणसांमुळे अनेक नेत्यांना शिवसेना सोडावी लागली, त्याच नेत्याच्या हातातून आज पक्ष सुटला. यामुळे एक वर्तुळ पूर्ण झाले, असे त्या म्हणाल्या.
मनसेने विक्रोळीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी शिवसेनेतील बंडखोरच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. www.konkantoday.com