चिपळूणमध्ये प्रजासत्ताक दिनी सर्वपक्षीय रेल रोको आंदोलन


चिपळूणच्या जंक्शन रेल्वे स्टेशनवर २६ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता सर्वपक्षीय रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात दहा हजारपेक्षा जास्त नागरिक सहभागी होतील, असे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला कळविले आहे. या आंदोलनामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाला घ्यावी लागेल. यामध्ये आणखी काही मागण्याचा समावेश करण्यात आला आहे.
चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचे ऑनलाईन भूमिपूजन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. तीन ते चार वर्षे झाली, तरी या मार्गाच्या कामाला अद्याप सुरूवात झालेली नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button