गद्दारांसाठी दोर कापलेले, त्यांना पुन्हा थारा नाही-माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते
गद्दारांसाठी दोर कापलेले, त्यांना पुन्हा थारा नाही
गद्दारांसाठी गडावरचे दोर कापलेले आहेत. त्यांना पुन्हा ठाकरे गटाच्या शिवसेनेत थारा नाही, चाळीस गद्दार गेले, पण आम्ही १४० निवडून आणू, पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर शासकीय यंत्रणा आणि गृह खात्याचा गैरवापर केला जातोय. हा गैरवापर आणि दडपशाही थांबवायची असेल तर सरकारने बदलावे लागेल आणि सरकार बदलणे केवळ तुम्हासारख्या कट्टर शिवसैनिकांच्या आणि सर्वसामान्य मतदारांच्या हातात आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी गुहागर विधानसभा मतदार संघातील लोटेमाळ येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले.
www.konkantoday.com