
राज्यात विद्यापीठाची परीक्षा घ्यायची की नाही या मुद्द्यावरुन सुरु झालेल्या वादात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने उडी घेतली
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विद्यापीठाची परीक्षा घ्यायची की नाही या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि राज्यपाल आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या परीक्षेऐवजी श्रेणीच्या निर्णयाला प्रलंबित ठेवत विद्यापीठ कायद्याप्रमाणे निर्णय होईल, अशी भूमिका घेतली आहे. याबाबत राज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठ कायद्याप्रमाणे घेण्यात येतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय कळवलं आहे.आता या वादात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ने उडी घेतली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. करण मधुकर कोकणे यांनी या संदर्भात पत्रक काढले आहे. या अवघड परिस्थिती मध्ये महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे. मोजक्या वर्गाचे हित पाहणाऱ्या काही पक्षांनी संघटनांनी राज्यपाल महोदयांना परीक्षा घेण्यासंदर्भात भेटून पत्र लिहून मागणी केलेली आहे. त्यांची ही मागणी बहुसंख्य विद्यार्थ्यांसाठी हानिकारक आहे. विद्यार्थी व समाजात कोरोनाचा प्रसार करणारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
www.konkantoday.com