लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस निरिक्षकांच्या बदल्या


लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस निरिक्षकांच्या जिल्ह्याबाहेर तर सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहे. मंगळवारी रात्री उशिरा बदल्याचे आदेश काढण्यात आले. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 4 पोलीस निरिक्षकांच्या रत्नागिरीत बदल्या करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरीतील भरत ज्ञानदेव धुमाळ, रत्नागिरी ग्रामीणचे मारुती जगताप, संगमेश्वरचे सुरेश गावित, देवरुखचे प्रदिप पोवार यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदली करण्यात आला आहे. त्यांच्या बदल्यात सिंधुदुर्ग येथून निळकंठ बगळे, अतुल जाधव, अमित यादव, फुलचंद मेंगडे यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

पोलीस निरिक्षकांसोबतच जिल्ह्यातील 10 सहाय्यक पोलीस निरिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये चिपळूणचे रत्नदीप साळोखे यांची रत्नागिरी ग्रामीणला, चिपळूणच्या रुपाली पाटील यांची रत्नागिरी शहरला, दाभोळचे तुषार पाचपुते यांची चिपळूणला, अलोरेचे सुजित गडदे यांची लांजा पोलीस स्थानकात, रत्नागिरी ग्रामीणचे मनोज भोसले यांची देवरुखला, पुर्णगडचे विजय जाधव यांची जिल्हा वाहतुक शाखेत, लांजाचे प्रविण देशमुख यांची चिपळूण येथे, नियंत्रण कक्षातील भरत पाटील यांची अलोरे येथे, जिल्हा वाहतुक शाखेतील सुधीर धायरकर यांची पुर्णगड येथे, स्थानिक गुन्हे शाखेतील अमोल गोरे यांची दाभोळ येथे बदली करण्यात आली आहे. त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील 11 पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. चिपळूणमधील वंदना कनौजा यांची खेड पोलीस स्थानकात तर पूजा चव्हाण यांची दापोली पोलीस स्थानकात, गुहागर येथील पवन कांबळे यांची रत्नागिरी शहरला, रत्नागिरी शहरच्या प्रशांत जाधव यांची खेड पोलीस स्थानकात, आकाश साळुंखे यांची स्थानिक गुन्हे शाखेत, शांताराम महाले यांची चिपळूण पोलीस स्थानकात बदली करण्यात आली आहे. खेड येथील सुजित सोनावणे यांची गुहागरला, रत्नागिरी शहरच्या अनुराधा मेहेर यांची चिपळूण येथे, चिपळूण पोलीस स्थानकातील शाम आरमाळकर यांची रत्नागिरी शहरला, राजापूर पोलीस स्थानकातील शिल्पा वेंगुर्लेकर यांची चिपळूण येथे तर सावर्डे येथील धनश्री करंजकर यांची राजापूर पोलीस स्थानकात बदली करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button