
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवसाची सुट्टी
22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या भव्य सोहळ्यासाठी देश-विदेशातील हिंदूंमध्ये मोठा उत्साह आहे. या दिमाखदार कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.अशा परिस्थितीत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे.
केंद्र सरकारने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भारतभरातील सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक प्रतिष्ठान येथे 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, लोकांमध्ये असलेला प्रचंड उत्साह पाहता केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये 22 जानेवारीला अर्ध्या दिवसाच्या सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे.
www.konkantoday.com