महामार्गावरील स्ट्रीट लाईट अखेर सुरू
मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. अशातच महामार्गावर स्ट्रीट लाईटचे पोल उभे करण्यात आले होते. गेल्या चार महिन्यांपासून हे स्ट्रीट लाईटचे पोल केवळ शोभेचे बाहुले ठरले होते. चिपळूण नगर पालिकेचे माजी नगरसेवक, भाजपचे युवा नेते परिमल भोसले यांनी गेल्या दोन महिन्यांपासून हे स्ट्रीट लाईट सुरू व्हावेत व वाहन चालकांची गैरसोय दूर व्हावी यासाठी पाठपुरावा केला होता. दोन दिवसात हायवेवरील स्ट्रीट लाईट सुरू झाले नाहीत, तर महामार्ग विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला होता. अखेर बुधवारी मुंबई-गोवा महामार्गावरील कापसाळ येथील समर्थ धाबा ते पंजाबी धाबा इथपर्यंतचे स्ट्रीट लाईट सुरू झाले असून येथे दोन दिवसात उर्वरित स्ट्रीट लाईट सुरू करण्याची ग्वाही ठेकेदाराने दिली आहे.
www.konkantoday.com