
भारत मुक्ती मोर्चाचा ईव्हीएम हटाव, देश बचाव नारा
भारत मुक्ती मोर्चाच्यावतीने ईव्हीएम हटाव देश बचाव रॅलीच्या घोषणांनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर लाओ, ईव्हीएमचे धोके या बाबत निवेदन निवडणूक आयोग व राष्ट्रपती यांच्यापर्यंत पोहचवण्याची विनंती जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. ३१ जानेवारी रोजी दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगावर ५ लाख लोकांचा मोर्चा काढण्यात येणार असून त्यात मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील मध्यवर्ती मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरूवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा व छत्रपती संभाजी महाराजांचा जयजयकार करत भारत मुक्ती मोर्चा रत्नागिरी जिल्हा युनिटतर्फे ईव्हीएम हटाव देश बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी मनोगतपर विचार व्यक्त करून रॅलीची सुरूवात करण्यात आली. यावेळी मुस्लिम, ओबीसी बांधव उपस्थित होते. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वळसा घालून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेण्यात आली. www.konkantoday.com