चिपळुणात जरांगेंच्या समर्थनाचा फलक काढला
जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा लढा उभारला जात असताना या पार्श्वभूमीवर मराठी क्रांती मोर्चातर्फे पाटील यांच्या समर्थनाचे जाहिरात फलक शहरात लावण्यात आले आहेत. असे असताना क्षत्रिय मराठा मेळाव्याच्या आयोजकांनी ते काढल्याने त्याचा निषेध मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. इतकेच नव्हे तर अशा आयोजकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी यासाठी बुधवारी चिपळूण पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही मराठा क्रांती मोर्चातर्फे जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जाहिरात फलक नगर पालिकेची परवानगी घेवून त्यांच्या अधिकृत बारकोडप्रमाणे लावला होता. तरी बुधवारी शहरात झालेल्या क्षत्रिय मराठा मेळाव्याच्या आयोजकांनी हा जाहिरात फलक आम्हाला न विचारता उलटा करून ठेवला, याचा संपूर्ण चिपळूण तालुका मराठा क्रांती मोर्चातर्फे निषेध करण्यात आला. www.konkantoday.com