
कोरेच्या कारभारामुळे आंबेडखुर्द रस्त्याचे काम ठप्प, पाच वाड्यांचा संपर्क तुटला
पंतप्रधान ग्रामडसक योजनेतून आंबेडखुर्द गावी सुरू असलेले रस्ता रूंदीकरण, खडीकरणाचे काम कोकण रेल्वेने अचानकपणे बंद पाडल्याने पाच वाड्यांचा संपर्क तुटला आहे.
आंबेडखुर्द गाव उंचावर असून बोलेवाडी, तांबेवाडी, बौद्धवाडी, हेमनवाडी, गवळवाडी अशा सहा वाड्या मिळून तेराशे लोकसंख्या आहे. या वाड्यांना जोडणारा शास्त्रीपुल ते आंबेडखुर्द रस्ता अरूंद असल्याने रिक्षेसह जड वाहनास ये-जा करणे धोकादायक झाले आहे. www.konkantoday.com