कोकणात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही-मराठा आरक्षण अभ्यासक राजेंद्र कोंढरे
विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील लोक ओबीसी प्रमाणपत्र घेवून आरक्षणाचा लाभ घेत आहेत. मात्र कोकणात परिस्थिती उलट आहे. तिकडे मराठा-कुणबी वेगळा आणि कोकणात मराठा व कुणबी सरळ सरळ वेगळे आहेत. त्यामुळे कोकणात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकत नाही. ती तांत्रिक अडचण आहे. त्यामुळे मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षणासाठी प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष व मराठा आरक्षण अभ्यासक राजेंद्र कोंढरे यांनी बुधवारी येथे केले. शहरातील कालभैरव देवस्थान मैदानावर क्षत्रिय मराठा समाजाच्यावतीने आयोजित कोकण विभागीय मेळाव्यात ते बोलत होते.
www.konkantoday.com