
किरण (भैय्या) सामंत आणि जिओ डिजीटलचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आणि उपाध्यक्ष सुनील गोसावी यांच्यात लांजा-राजापूर भागातील नेटवर्क समस्या दूर करण्याबाबत प्रदीर्घ चर्चा
राजापूर – डिजिटल इंडियाच्या युगात जवळपास सर्वच सामाजिक आणि आर्थिक व्यवहार इंटरनेटवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत, लांजा-राजापूर भागातील नागरिक खराब मोबाइल नेटवर्कमुळे प्रचंड त्रस्त होते. या समस्येबाबत सिंधुरत्न योजनेचे सदस्य आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरणभय्या सामंत यांनी आवाज उठवला होता. या मागणीच्या आधारे, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रिलायन्स कंपनीला पत्र पाठवून या भागातील नेटवर्क सुधारण्याची विनंती केली होती.किरणभय्या सामंत यांच्या मागणीच्या आधारे, जिओचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आणि उपाध्यक्ष सुनील गोसावी आणि उप महाव्यवस्थापक नितीन कुमार जैन यांनी सामंत यांच्याशी चर्चा केली आणि लांजा-राजापूर भागातील नेटवर्क समस्या दूर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले. या भागात प्राथमिक सर्वेक्षण होऊन जिओ अधिकचे टॉवर उभारून नेटवर्क सुधारण्यात येणार आहे. किरणभय्या सामंतांच्या पाठपुराव्यामुळे लांजा-राजापूर भागातील नागरिकांना जलद इंटरनेट सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डिजिटल इंडियामुळे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार इंटरनेट शिवाय पूर्ण होत नाहीत, खराब नेटवर्क मुळे या भागातील नागरिकांचा दैनंदिन जीवनात प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. मात्र किरणभय्या यांच्या पुढाकारामुळे लांजा-राजापूर भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. फोटो – सिंधुरत्न योजनेचे सदस्य श्री किरणभय्या सामंत आणि जिओ डिजीटल चे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आणि उपाध्यक्ष सुनील गोसावी यांच्यात लांजा-राजापूर भागातील नेटवर्क समस्या दूर करण्याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. अधिकचे टॉवर उभारून या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन कंपनीतर्फे देण्यात आले आहे.