
उबाठा गटाच्या शिवसैनिकांच्या राष्ट्रवादीतपक्ष प्रवेशाने संगमेश्वर उबाठा गटात एकच खळबळ
आम्ही आदेशावर काम करणारे कार्यकर्ते आहोत. आमदार साहेब ाम्ही आता तुमचे नेतृत्व स्वीकारले आहे. तुमचा शब्द हाच आमच्यासाठी आदेश असेल. तुमच्यासाठी आणि पक्षासाठी आम्ही वाटेल ते करू. असा विश्वास देत चिपळूण तालुक्यातील धामापूर जिल्हा परिषद गटातील शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, सरपंच आणि शेकडो शिवसैनिकांनी मंगळवारी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात जाहीर प्रवेश केला. उबाठा गटाच्या शिवसैनिकांच्या पक्ष प्रवेशाने संगमेश्वर उबाठा गटात एकच खळबळ उडाली आहे.
www.konkantoday.com