उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात थंडी वाढली
उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात थंडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्र तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली असला तरी उर्वरित राज्यात किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे.आज (ता. १८) किमान तापमानात वाढ होणार असली तरी गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असून, बुधवारी (ता. १७) पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये धुक्याचे साम्राज्य कायम आहे. पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेशात थंडीच्या लाटेबरोबर थंड दिवस अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात थंडी वाढली असून, धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९.२ तर जळगाव येथे ९.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यात किमान तापमानाचा पारा ११ ते १६ अंशांच्या दरम्यान आहे. राज्यात किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे
www.konkantoday.com