आमदार राजन साळवी यांच्यावर सूडबुद्धीने-खासदार विनायक राऊत
मुंबई:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत आमदार राजन साळवी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीतून केलेल्या आजच्या ACB च्या कारवाईचा मी धिक्कार करीत आहे. कितीही त्रास झाला तरी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडणार नाही असे ठणकावून सांगणाऱ्या आमदार राजन साळवी आणि सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना जाणीवपूर्वक त्रास देवून मिंधे गटामध्ये सामील होण्यासाठी अशी कपट कारस्थाने केली जात आहेत. परंतु अश्या दमनशाहीला भीक न घालणाऱ्या आमदार राजन साळवी यांचा मला अभिमान आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत. यासोबतच मी ACB चे अधिकारी आणि सध्याचे सत्ताधारी सांगू इच्छितो कि आमदार राजन साळवी यांच्यासारख्या लाखो निष्ठावंतांच्या सामर्थ्यातूनच उद्याची शिवसेना उभी राहणार आहे.
निष्ठावंत शिवसैनिक तुमच्या कोणत्याही दडपशाहीला बळी पडणार नाहीत असे याप्रसंगी बोलताना खासदार विनायक राऊत यांनी ठणकावून सांगितले.
www.konkantoday.com