सावर्डे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे निधन
मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे येथे दुचाकीवरून जात असताना पडून डोकीला मार लागलेल्या व्यक्तीचे निधन झाले आहे. हा अपघात दि. १४ डिसेंबर रोजी झाला होता. या अपघातानंतर पुणे येथे उपचार सुरू असताना ३० डिसेंबर रोजी सायंकाळी निधन झाले. यातील खबर देणार हे देवयानी हॉस्पिटल डहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे येथे वैद्यकीय अधिकारी असून यातील मयत नितीन पांडुरंग वैद्य (५५, रा. सावर्डे) यांना दि. १४ डिसेंबर २०२३ रोजी सावर्डे येथे दुचाकीवरून जात असताना पडून डोकीस मार लागल्याने डोक्याला दुखापत झाल्यानंतर पोलीस स्टेशन ऑफिसर सावर्डे पोलीस ठाणे यांच्या सूचनेनुसार प्रथमोपचारास त्यांचे नातेवाईक यांनी वालावलकर हॉस्पिटल डेरवण येथे नेले परंतु अधिक उपचारासाठी देवयानी हॉस्पिटल इराणकर कॉलनी, कोथरूड, पुणे येथे घेवून गेले असता दि. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी नितीन पांडुरंग वैद्य हे मयत झाले म्हणून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
www.konkantoday.com