शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2023’ साठीप्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाजमाध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2023 ते 31 डिसेंबर, 2023 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2024 असा आहे.
कोकण विभगातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in व www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
पुरस्कारांची माहिती
अ.क्र पुरस्काराचे नाव पारितोषिक
- अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार(राष्ट्रस्तरीय) 1,00,000/- (रुपये एक लाख रोख) (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक)
- बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
- अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
- बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
- मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
- यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
- पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
- तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
- केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
- समाजमाध्यम पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
- स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
- पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
विभागीय पुरस्कार - शि.म.परांजपे पुरस्कार, (कोकण विभाग) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार स्पर्धेत जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभाग घ्यावा असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे.
www.konkantoday.com