रत्नागिरीत ३५ कलाकार करणार त्रिवार जयजयकार रामा२१ जानेवारीला संध्याकाळी ६ वाजता खातू नाट्यमंदिर रंगणार कार्यक्रम


रत्नागिरी : अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्री राममंदिर सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रत्नागिरीतील ३५ हून अधिक कलाकार त्रिवार जयजयकार रामा हा राम गीतांचा अनोखा आणि ऐतिहासिक ठरेल असा कार्यक्रम सादर करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला व विनामूल्य आहे. जास्तीत जास्त रसिकांनी व रामभक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

या कार्यक्रमात गायक आनंद पाटणकर, नरेंद्र रानडे, राम तांबे, श्रीधर पाटणकर, अभिजित भट, अभिजीत नांदगावकर, चैतन्य परब हे गायक आणि संध्या सुर्वे, अनुराधा गोखले, इरा गोखले, कश्मिरा सावंत, वैष्णवी जोशी, करूणा पटवर्धन, श्वेता जोगळेकर, तन्वी मोरे या गायिका सहभागी असणार आहेत. या गायक कलाकारांना तबलासाथ हेरंब जोगळेकर, संजय तथा पांडुरंग बर्वे, सचिन भावे, केदार लिंगायत, निखिल रानडे, राजू धाक्रस, हार्मोनियम साथ विजय रानडे, चैतन्य पटवर्धन, निरंजन गोडबोले, संतोष आठवले, मंगेश मोरे हे कलाकार करणार आहेत. पखवाजसाथीला राजा केळकर आणि मंगेश चव्हाण, कि- बोर्ड राजन किल्लेकर, तालवाद्य साथ प्रा. सुहास सोहनी आणि हरेश केळकर करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन निबंध कानिटकर आणि पूर्वा पेठे करणार आहेत.

कार्यक्रमाची ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था उदयराज सावंत यांची असून रंगमंच सजावट प्रशांत साखळकर, रंगमंच व्यवस्था मिलिंद गुरव यांची आहे. ३५ पेक्षा जास्त कलाकार सहभागी असणाऱ्या या कार्यक्रमात राम गीते सादर केली जाणार आहेत. या कार्यक्रमात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे कारसेवकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला जाणार आहे. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला आणि विनामूल्य असणार आहे. जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button