
न्याय मिळाल्याशिवाय आझाद मैदान सोडणारनाही, शिक्षक समन्वय संघाचा निर्वाणीचा इशारा
महाराष्ट्र राज्यातील अंशतः विनाअनुदानीत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना दिल्या शब्दाप्रमाणे दि. १ जानेवारीपासून वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा द्यावा, तसा शासन निर्णय जाहीर करा, उर्वरित टप्पे प्रत्येक वर्षी नैसर्गिक टप्पा वाढीने देण्यात यावेत या एकमात्र मागणीसाठी शिक्षक संघटनांच्या शिक्षक समन्वय संघाने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला धार आली असून शासनाने तत्काळ दखल घ्यावी, शासन निर्णय जरी करावा, असे आवाहन शिक्षक समन्वय संघाने केले आहे. गेल्या २० वर्षाहून अधिक काळ शोषण झालेल्या शिक्षकांना हक्काच्या वेतनाचा वाढीव टप्पा देत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही. शासनाने अंत पाहू नये, यापेक्षा उग्र आंदोलन केले जाईल, असा निर्वाणीचा इशारा आझाद मैदानातून शिक्षक समन्वय संघाने दिला आहे. www.konkantoday.com