कोकण रेल्वेने फुकट्यांकडून महिनाभरात तब्बल १ कोटी ९५ लाख ६४ हजार ९२६ रुपयांचा दंड केला वसूल
कोकण रेल्वेने प्रवास करताना विना तिकीट प्रवास करणाऱ्या ७,०१३ प्रवाशांवर कोकण रेल्वे प्रशासनाने कारवाई करत महिनाभरात तब्बल १ कोटी ९५ लाख ६४ हजार ९२६ रुपयांचा दंड वसूल केला आहे. पाच महिन्यात २७,८३८ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून ४ कोटी ८७ लाख ८५ हजार १५२ रुपयांचा दंड वसूल केला आहे.
गाडीला गर्दी असल्याची संधी साधून काही प्रवासीविना तिकीट गाडीत घुसतात. त्यामुळे रीतसर तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर अन्याय होतो. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाचे करोडो रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यासाठी आँगस्ट २०२३ महिन्यापासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक महिन्याला कोकण रेल्वे प्रशासनाची ही कारवाई सुरू असते.
डिसेंबर २०२३ या महिन्यात राबविलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत विना तिकीट प्रवास करणाऱ्या ६,६७५ प्रवाशांकडून १ कोटी ९५ लाख ६४ हजार ९२६ रूपयांचा दंड वसूल केला आहे.ऑगस्ट ते डिसेंबर २०२३ या पाच महिन्यात करण्यात आलेल्या तिकीट तपासणीत २७,८३८ विनातिकीट प्रवासी आढळले. त्यांच्याकडून ४ कोटी ८७ लाख ८५ हजार १५२ रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. यापुढेही तिकीट तपासणी मोहीम नियमित सुरू रहाणार आहे. यात दोषी आढळलेल्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणारआहे. कोकण रेल्वे आँगस्ट २०२३ पासून सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. यापुढेही कोकण रेल्वे प्रशासनाकडून ही धडक कारवाई सुरूच राहणार आहे. अभिमानाने प्रवास करा, सन्मानाने प्रवास करा, तिकीट खरेदी करा आणि अभिमानाने प्रवास करा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.
www.konkantoday.com