वाहनाच्या नुकसानीस व दुखापतीस कारणीभूत झालेल्या टेम्पो चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
रत्नागिरी तालुक्यातील निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावर जाकादेवी येथे टेम्पोने समोरुन येणाऱ्या रिक्षाला ठोकर दिली. या अपघातात रिक्षा चालक व प्रवाशांना दुखापत झाली. वाहनाच्या नुकसानीस व दुखापतीस कारणीभूत झालेल्या टेम्पो चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. १३) रात्री आठच्या सुमारास जाकादेवी रस्त्यावरील हॉटेल गारवाच्या समोर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी दिनेश विठ्ठ धामणे (वय ४९, रा. खालगाव, धामणेवाडी, रत्नागिरी) हे रिक्षा (क्र. एमएच-०८ एक्यू ५२७३) घेऊन निवळी ते जाकादेवी असे जात होते. रिक्षा जाकादेवी बाजारपेठे येथे आली असता हॉटेल कोकण गारवाचे समोर रस्त्यावर ट्रक (क्र. एमएच-०९ सीव्ही ८८४४) थांबलेला होता. जयगडहून येणाऱा टेम्पो (क्र. एमएच-५० एन १९९२) वरील चालक त्या वाहनाला बाजू देवून पुढे येत असताना समोरुन येणाऱ्या रिक्षाला ठोकर देवून अपघात केला. यामध्ये रिक्षा चालक व प्रवासी यांना लहानमोठी दुखापत झाली. तसेच टेम्पो चालक रिक्षाच्या नुकसानीस कारणीभूत झाला. या प्रकरणी दिनेश धामणे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com